राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे 
महाराष्ट्र

पाथर्डीत प्रताप ढाकणे झाले सक्रिय, पवारांचे पाठबळ

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः पाथर्डी तालु्क्यातील ढाकणे कुटुंबीय म्हणजे राजकारणातील बुलंद तोफ कोणत्याही पक्षात असले तेथे स्वतःचे निर्माण करतात. बबनराव ढाकणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातही महाराष्ट्राचा दिल्लीत पोहचवला. आता अॅड. प्रताप ढाकणेही Pratap Dhakane तोच वारसा पुढे चालवित आहेत. भाजपमधून राजकीय कारकीर्द चमकत असतानाच ते तेथून बाहेर पडले. खासदार (कै.) दिलीप गांधी Dilip Gandhi यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता. पक्षाने दखल न घेतल्याने ते राष्ट्रवादीत गेले.

राष्ट्रवादी त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. तरीही ते राष्ट्रवादीत टिकून आहेत. केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. कारखाना यशस्वीरित्या चालवित आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून जरासे लांब असल्याचे दिसत होते. कोविडच्या काळात त्यांनी कोविड सेंटर सुरू केले. इतर विकासकामांतही त्यांचा पुढाकार होता. Pratap Dhakne became active in Pathardi's politics

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आणि ओबीसीच्या राजकारणाने उचल खाल्ल्याने ते पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत. रविवारी (ता. १८) पाथर्डीत आमदार रोहित पवार Mla Rohit Pawar यांच्या उपस्थितीत कार्यक्रमातून त्यांनी आगामी रणनीती काय असेल याचे संकेत दिले आहेत. ढाकणे यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम असेल.

ढाकणे यांच्या घराण्याचे ऊसतोड कामगार नेतृत्व मानतात. कोणताही संप झाला की त्यांची भूमिका महत्त्वाची असते. वंजारी समाजातही त्यांचे मोठे वजन आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांना मिळालेली मते लक्षणीय आहेत. आता वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी मागील सर्वकाही विसरून कामास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास पवार घराण्यातील आमदार रोहित पवार यांना आमंत्रित करून पक्षांतर्गत विरोधकांनाही इशारा दिला आहे.Pratap Dhakne became active in Pathardi's politics

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करीत आहे. जिल्हा परिषदेवर पक्षाची सत्ता असल्याने ती जमेची बाजू आहे. पक्ष बळकट करणे हे महत्त्वाचे आहे.

- ॲड. प्रताप ढाकणे, अध्यक्ष, केदारेश्‍वर कारखाना

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT