UPSC Success Story Saam Tv
महाराष्ट्र

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

UPSC Success Story of Prashant Bhojane: प्रशांत भोजने यांनी ९व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांची आई ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. दृढ निश्चय आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

प्रशांत भोजने यांचा प्रेरणादायी प्रवास

नवव्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC

स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला प्रशासकीय अधिकारी

परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करायला यायला हवी. असंच काहीसं प्रशांत भोजने यांनी केली. त्यांनी खूप हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. त्यानंतर आज त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. ते प्रशासतीय अधिकारी म्हणून कार्यरत झाले आहे.

प्रशांत भोजने यांनी ३१व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. प्रशांत यांची आई ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. स्पर्धा परीक्षा पास करावी, हे प्रशांतचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.

नवव्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC

प्रशांतने २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केला. त्यांनी सलग ९वेळा यूपीएससी परीक्षा दिली. नवव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.

प्रशांतची आई ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. वडील नागरी संस्थेत कम करतात. प्रशांतचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. परंतु त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याला इतर कोणत्याही कामात रस नव्हता. त्याने यूपीएससी परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली.

कोचिंग सेंटरमध्ये काम करुन उदर्निवाह

यूपीएससी परीक्षा देताना त्याने दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो मॉक टेस्ट तपासायचा. त्यावेळी कोचिंग सेंटरमध्ये काम करुन त्याचे उदरनिर्वाह केला. यावेळी कुटुंबियांनी त्याला परत येण्यास सांगितले होते. परंतु प्रशांतच निश्चय दृढ होता. त्यांनी अथक प्रयत्नांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

पुण्यात १ हजार बोगस मतदार आणले? कुणी केला गंभीर आरोप? राजकीय वर्तुळात खळबळ

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Coconut water Benefit: हिवाळ्यात नारळ पाणी पिल्याने आरोग्याच्या 'या' समस्या दूर होतात

ऐन मतदानाच्या दिवशी मोठा राडा; वादानंतर गोळीबार; जळगावमध्ये नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT