prakash Ambedkar  Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : ओबीसी समाजाने काय करावं? लक्ष्मण हाकेंना भेट देत प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला, Video पाहा

Prakash Ambedkar on obc reservation : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

Vishal Gangurde

जालना : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरल आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, यासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. यानिमित्ताने लक्ष्मण हाके यांना भेट देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना ओबीसी समाजाला सल्ला दिला आहे. 'ओबीसींनी राजकीयरित्या दुसरा मार्ग म्हणजे सत्ता हातामध्ये घेऊन मार्ग काढला पाहिजे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन दोघांनी पाणी घेतले. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले,'नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हे दोघे उपोषणाला बसले आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. या मुद्यावरून जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लोक मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दोन समाज आमने-सामने आलेले आहेत. बेरोजगारी भर घालत आहेत. जगण्यासाठी साधन मिळालं, त्यावरच हल्ला होतोय, याची चिंता ओबीसी समूहाला आहे. यासाठी राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला पाहिजे. त्यातून मार्ग काढला पाहिजे'.

'आम्ही याबाबत भूमिका जाहीर केली आहे. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. मंडल आयोगाने ते निर्माण केलंय. त्यावेळी अनेक मोर्चे निघाले. निकाल सुद्धा लागला होता, असं म्हणत आयोगाच्या इतिहासाची आठवण करून दिली. शासनाने ताबडतोब लक्ष घालावे. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींना असायला हवे, ही वंचितची भूमिका असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केले.

'ओबीसींनी सत्ता हातामध्ये घेण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. ओबीसी आरक्षण वेगळे ठेवून मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसी समाजाला सत्ता हातात घ्यावी लागेल. हा पर्याय दिसतो. ओबीसी नेत्यांनी विचार केला पाहिजे. या निवडणुकीत संविधनादी आणि संविधानविरोधी लढा झाला. या लढ्यामध्ये संविधानवादी मतदार जिंकला. आता निवडून आलेले संविधानवादी आहे, याची कोणाला गॅरंटी नाही, असा अप्रत्यक्ष टोला प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधारी आणि विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dakshin Ganga: कोणत्या नदीला 'दक्षिण भारताची गंगा' म्हणतात? जाणून घ्या

हृदयद्रावक घटना ! दोन सख्ख्या बहि‍णींचा बुडून मृत्यू, जेवणापूर्वी हातपाय धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाहीत

Box Office Collection : 'बाहुबली' की 'थामा' संडेला कोणी मारली बाजी? 'द ताज स्टोरी'ने कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना

मुंबईतील कोर्टातच ज्येष्ठ महिला वकिलाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; पतीचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT