Shreya Maskar
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला. 'इक्कीस' चित्रपट श्री राम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे.
'इक्कीस' चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
'इक्कीस' चित्रपटात धर्मेंद्र, अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, आद्यांशी कपूर, एकवली खन्ना, सिमर भाटिया, श्री बिश्नोई, सिकंदर खेर हे कलाकार झळकले आहेत.
'इक्कीस' चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातून गाणी मनाला भारावून टाकतात.
'इक्कीस' चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. यात भारत-पाकिस्तान युद्ध दाखवले आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'इक्कीस' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.00 कोटी रुपये कमावले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार,'इक्कीस' चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडिओने खरेदी केले आहेत. थिएटर गाजवल्यावर चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे.
असे बोले जाते की, चित्रपट ओटीटीवर मार्च महिन्यात पाहायला मिळेल. मात्र अद्याप अधिकृत रित्या कोणतीही रिलीज डेट समोर आली नाही.