Shreya Maskar
आज (1 जानेवारी 2026 ) प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. आज नाना पाटेकर 75 वर्षांचे आहे.
नाना पाटेकर यांनी 1978 सालच्या 'गमन' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 1979 साली रिलीज झालेला 'सिंहासन' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
नाना पाटेकर यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे त्यांचा जन्म झाला. नाना व्यापारी कुटुंबातील होते. नाना पाटेकर यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केले. नाना सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून पदवीधर झाले.
नाना पाटेकर यांच्या बायकोचे नाव नीलकांती पाटेकर असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव मल्हार पाटेकर असे आहे.
नाना पाटेकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 2013 साली पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.
नाना पाटेकरांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. फिल्मी दुनियेत त्यांना सर्वजण 'नाना' पाटेकर या नावाने ओळखतात.
'द लल्लनटॉप' ला दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले की, "माझ्या आईची एक मैत्रीण होती. जवळजवळ बहिणीसारखी... लहानपणी ती मला प्रेमाने 'नाना' म्हणायची. तेव्हापासून लोक मला नाना बोलायला लागले..."
नाना पाटेकरांच्या पासपोर्टवर, आधार कार्डवर आणि प्रत्येक कागदपत्रावर 'नाना' हेच नाव पाहायला मिळते. असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.