Shreya Maskar
आज (1 जानेवारी 2026 ) प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. आज नाना पाटेकर 75 वर्षांचे आहे.
नाना पाटेकर यांनी 1978 सालच्या 'गमन' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 1979 साली रिलीज झालेला 'सिंहासन' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्री गाजवल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. अलिकडेच अभिनेते 'हाऊसफुल 5' या हिंदी चित्रपटात आणि 'ओले आले' या मराठी चित्रपटात झळकले.
नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' चित्रपट 2016 ला रिलीज झाला. या चित्रपटातील "कुणी घर देता का घर?" हा डायलॉग आजही तुफान गाजतोय.
2007 साली रिलीज झालेल्या 'वेलकम' चित्रपटात "कंट्रोल...उदय...कंट्रोल!" हा डायलॉग आहे.
1994 मध्ये रिलीज झालेल्या 'क्रांतिवीर' चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग- "आ गए मेरी मौत का तमाशा देखने"
"भगवान का दिया सब कुछ है, दौलत है शोहरत है, इज्जत है..." हा डायलॉग आजही लोक आवर्जून बोलतात.
1997 मध्ये रिलीज झालेल्या 'यशवंत' चित्रपटातील "एक मच्छर साला आदमी को हिजड़ा बना देता है।" हा डायलॉग लोकप्रिय झाला.