Arakshan Bachav Yatra Saam Tv
महाराष्ट्र

Arakshan Bachav Yatra : प्रकाश आंबेडकर आजपासून काढणार आरक्षण बचाव यात्रा, सरकारकडे केल्या ६ मोठ्या मागण्या

Arakshan Bachav Yatra News : प्रकाश आंबेडकर आजपासून म्हणजेच २५ जुलैपासून राज्यात 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार आहेत. ७ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे.

Satish Daud

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं असलं तरी ते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. दुसरीकडे ओसीबी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आजपासून म्हणजेच २५ जुलैपासून राज्यात 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार आहेत. ७ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता चैत्यभूमीवरुन यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे.

राष्ट्रवादीचे(शरद पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचं निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लागले आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे ६ मोठ्या मागण्या केल्या आहेत. ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे. Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे. 100 ओबीसी आमदार निवडून आणणे. ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी, अशी आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

SCROLL FOR NEXT