पुन्हा एखादे अजीत पवार तयार होणार नाहीत याची काळजी घ्या- आंबेडकर Saam TV
महाराष्ट्र

पुन्हा एखादे अजीत पवार तयार होणार नाहीत याची काळजी घ्या- आंबेडकर

म्हणून या पद्धतीने सर्व चाललेलं आहे असे मत वंचित बहूजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि BJP च साटंलोट असल्याचं उघड झालं आहे. खासदारकीला BJP ने माणूस उभा केला त्याने नंतर माघार घेतली. प्रज्ञा सातव यांच्या निवडणूकित भाजपने माणूस उभा केला त्याने माघार घेतली. हे एक घोतक आहे की यांचं आतून काही तरी जमलेलं आहे. म्हणून या पद्धतीने सर्व चाललेलं आहे असे मत वंचित बहूजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

मी असं मानतो, की एक नवीन आघाडी उभी राहू पाहतेय म्हणून मी अस सांगतो की पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अजित पवार यांनी पक्ष सोडून बीजेपी बरोबर जाऊन बसले होते. नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यांच्या विरोधात ज्या काही चौकशा होत्या त्याच काय झालं हे स्पष्टचं आहे, आणि ते पुन्हा बॅक टू पव्हॅलीयन आले. एनसीबी मध्ये अनेक मंत्र्यांच्या विरोधात चौकशा सुरू आहेत. एक स्पष्ट आहे की जे छुपं होत ते आता उघडं पडलं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. एक सरळ दिसतंय की NCP ने ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून काँग्रेस वाल्यानं उघड पाडलं आहे. काँग्रेस वाल्यांला थोडीशी लाज शिल्लक असेल तर ते या सरकार मधून बाहेर पडतील. आणि स्वतःची गेलेली अब्रू वाचवतील.

माझं कोर्टाकडे एकच मागणं राहणार आहे की आता पर्यंत जो काही तपास झाला आहे, त्या तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर हायकोर्ट विश्वास ठेवत होत. आता मी कोर्टात एवढीच विनंती करेन की जो कोणी तपास अधिकारी आहे त्याला कोर्टाच्या अधिपत्या खाली घ्या आणि त्याला सांगा की जेवढी कागदपत्रे कोर्टाने नाव नंबर सह ताब्यात घेऊन रजिस्टर कडे द्यावीत, आणि विरोधी पक्षाच्या लोकांना इंस्पेक्षण करायला द्यावीत. जेणे करून खरं काय ते बाहेर येईल असे मत प्रकाश आंबेडकर यांनी परमबीर सिंग प्रकरणावर व्यक्त केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT