अजितदादांच्या निधनावर प्रकाश आंबेडकरांनी भावुक पोस्ट केली
अजित पवारांच्या निधनाने मला धक्का बसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या पार्थिवाला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो समर्थक बारामतीला पोहोचले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भावुक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली.
अजित पवारांच्या निधनाच्या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'अजित पवारांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसलाय. अजित पवार यांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, ती नाकारता येणार नाही. त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे'.
बारामती विमान अपघातात अजित पवारांसह ५ जणांनाही प्राण गमवावे लागलेत. प्रशासनावर पकड असलेला नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा राज्याला प्रचंड मोठा धक्का आहे. कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकलाय. जे काही नुकसान झालंय, हे भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात', असे शरद पवार म्हणाले.
'मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. माध्यमांमध्ये या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावर मांडली गेली, असं कळलंय. पण यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.