Maharashtra Politics Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: 'आरोग्यमंत्र्यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवावे, उलटीच्या गोळ्या घ्याव्या', राष्ट्रवादीवरील टीकेनंतर बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bachchu Kadu On Tanaji Sawant: तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने महायुतीत तणाव वाढला असून अजित पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनीही यावरुन तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ३१ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे कधीही पटले नाही, सध्या जरी एकत्र मांडीला मांडी लाऊन बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने महायुतीत तणाव वाढला असून अजित पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनीही यावरुन तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणालेत बच्चू कडू?

"तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरांना दाखवून द्यावे आणि उलटीच्या गोळ्या घ्याव्या, त्यांच्याकडे नसेल तर मी पाठवून देतो, असा खोचक टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांची अवकात काढणं एवढं सोपं काम नाही, मंत्री जर अशा पद्धतीने धाडस करत असेल तर शेतकरी त्यांना त्यांची अवकात दाखवेल. ज्याप्रकारे दानवेंनी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं, त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत पाडलं, त्याच प्रकारे तानाजी सावंत यांना सुद्धा त्या परिणामाला सामोरे जावे लागेल," असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

आमच्याशिवाय सरकार बसणार नाही!

"कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला पाठिंबा नाही द्यायचा हे शिरसाट काही ठरवणार नाही, ते आम्ही ठरवू जनता ठरवेल. आज आमचे दोन आमदार आहे ज्यावेळेस अशी वेळ येईल की आमच्या शिवाय सरकार बसणार नाही त्यावेळी शेतकरी शेतमजूर व आम्ही आमच्या मुद्द्याशिवाय कोणासोबत जाणार नाही," असे म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

रवी राणा- नवनीत राणांवर टीका!

"रवी राणा यांच्याविरोधात आम्ही आधीच कोर्टात गेलो आहोत त्यांना नोटीससुद्धा गेली असेल. आग लागल्यावर धूर निघत असतो, त्या धुराकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना पडण्याचं दुःख आहे. आमचा हिशोब जनता घेईल, त्यांच्या हाती काय आहे? जे स्वतः पडले ते दुसऱ्याला पाडण्याची काय भूमिका बजावणार आहे? राजकुमार पटेल व माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला तरी मतदारसंघातील लोक ठरवतील, मत लोक मारतात.आमचा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करते, तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT