Pune Traffic Issue: 'चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला, पण...'; चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरींकडे केली नवी मागणी

Chandrakant Patil: नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे.
Pune Traffic Issue
Pune Traffic IssueSaam tv
Published On

Chandrakant Patil News: पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. (Latest Marathi News)

पादचारी पूल उभारण्यात येईपर्यंत नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये, महामार्ग ओलांडताना विशेष दक्षता घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी केले.

पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार चांदणी चौक प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या नवीन पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. मात्र, सदर भागात पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागत होते.

सदर बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.तसेच या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. "चांदणी चौकाच्या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात पादचारी पूल (footover Bridge) चा समावेश नव्हता. त्यामुळे पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागते. असे करताना अपघाताची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री नात्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली."

पाटील यांनी ट्विट मध्ये पुढे म्हणाले आहे की, "पाषाण ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे चांदणी चौकात नवीन पादचारी पूल (FOB) उभारण्यात येणार असून हा पूल नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त आणि महत्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडू नये, महामार्ग ओलांडताना विशेष दक्षता घ्यावी अशी माझी सर्व पुणेकरांना विनंती आहे." असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com