Free Food Grains Saam TV
महाराष्ट्र

Free Food Grains: गरिबांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य

Free Food rains Next 5 Years: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये ८१.३५ कोटी व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. पीएमजीकेएवाय ही जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे.

Ruchika Jadhav

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana:

गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील सलग ५ वर्षे नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे. पीएमजीकेएवाय या योजनेअंतर्गत केंद्र सरकार अन्न अनुदानावर पुढील ५ वर्षांत ११.८० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता आणि सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी पीएमजीकेएवायअंतर्गत मोफत अन्नधान्य (Food Grains) पुरवणे पुढील पाच वर्षे सुरू ठेवले जाणार आहे.

कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता पीएमजीकेएवाय ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तींना ५ किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमजीकेएवाय अंतर्गत १ जानेवारी २०२४ पासून पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद आहे. या योजनेसाठी राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता नागरिकांना दिसत आहे. मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्याचे शाश्वत रीतीने शमन होईल आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह दीर्घकालीन किंमत धोरणाची हमी राहील.

लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे असं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT