मोठी बातमी! शरद पवारांचे खासदार मोदींची भेट घेणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar NCP MPs meeting Narendra Modi in Delhi : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमागील कारण अद्याप स्पष्ट आहे. पण याची राज्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली.

Why are Sharad Pawar MPs meeting Narendra Modi? : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व खासदार सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पुण्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात या अचानक आलेल्या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे सर्व खासदार एकत्रितपणे पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांचे सर्व खासदार एकत्र जाऊन पंतप्रधान मोदींना का भेटत आहेत, या भेटीमागील मुख्य कारण किंवा विषय अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासकामे किंवा काही महत्त्वाची धोरणात्मक चर्चा या भेटीदरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com