power cut cause 500 hundred chickens death bhandara youth blames mahavitaran Saam Digital
महाराष्ट्र

Bhandara: महावितरणने 500 कोंबड्यांच्या मृत्यूची जबाबदारी घ्यावी? सोनपूरीचे पोल्ट्रीधारक संतप्त

power cut cause 500 hundred chickens death bhandara youth blames mahavitaran: प्रसंगी ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा इशारा शेतक-याने महावितरणला दिला आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला 10 लाख ट्रॉन्सफार्मरचे भरून 24 तास विज पुरवठा संलग्न केला असतांना सुद्धा सोनपूरी येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील विद्यृत पुरवठा सतत सहा तास खंडीत राहिल्याने तब्बल 500 पेक्षा अधिक कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. महावितरणच्या दिरंगाईमुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

या घटनेबाबत गिरीश कठाणे म्हणाले मी बॅंक ऑफ इंडिया मधून 12 लाखांचे कर्ज घेऊन गावीच शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यृत पुरवठा खंडित झाला. एकोडी महावितरणला फोन केला करुन येथे 24 तास वीज पुरवठा संलग्न केला आहे. दरम्यान उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत मृत्यू हाेत आहेत.

वीज पूरवठा गेल्यानंतर ओजल पोल्ट्री फार्मवर कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे ही क्रिया करून कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण ते प्रयत्न विफल ठरले.

दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आम्हांला याेग्य उत्तर न देता विद्युत पूरवठा सुरू होणार ऩसल्याचे सांगितले. यात 6 तासांपेक्षा जास्त अवधीने वीज पुरवठा खंडीत झाला व बुधवारी 472 कोंबड्या आणि आज (गुरूवार) पहाटे 57 कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे कठाणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

SCROLL FOR NEXT