Viral Video: एक, दोन नाही तर चक्क चार पायांची कोंबडी पाहिलीत का? व्हिडीओ होतोय व्हायरल

शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पहिल्यांदा समजले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: सोशल मीडियावर आश्चर्यचकीत करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर असे असातत जे पाहून आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. यात कधी एखाद्या महिलेला एकमेकांना जोडून जन्माला आलेली मुलं पाहायला मिळतात तर कधी प्राण्यांचे (Animal) अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात कोंबडीची पिल्ल तुम्ही सर्वांनी पाहिलीच असतील. कोंबडीच्या पिल्लांना दोन पाय असतात. मात्र कोल्हापूरमध्ये एका कोंबडीने चक्क चार पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. हे पाहून गावकरी चकीत झालेत. (Latest Marathi News)

Viral Video
Kolhapur Football : फुटबॉल कतारमध्ये...पण कोल्हापुरात जबरदस्त किक; फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कोल्हापूरच्या (Kolhapur) बोरिवडे येथे सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या घरी हा प्रताप घडला आहे. शिंदे हे कुकुट पालनाचा जोडव्यवसाय करतात. शनिवारी त्यांच्या एका कोंबडीने बारा पिल्लांना जन्म दिला. त्यातील एका पिल्लाला जन्मताच चार पाय आहेत. शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पहिल्यांदा समजले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी पिल्लाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Viral Video
Kolhapur News : महावितरणचा भोंगळ कारभार; वीजेचे कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्याला पाठवलं भरमसाठ बिल

विशेष बाब म्हणजे हे पिल्लू इतर पिल्लांप्रमाणेच निरोगी आणि सुस्थितीत आहे. त्याला कोणताही त्रास जाणवत नाही. इतर पिल्लांप्रमाणे त्याला पुढे दोन पाय आहेत. तसेच मागेही दोन पाय आहेत. यामुळे गावात या अनोख्या पिल्लाची एकच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील कोंबडीचं चार पायांच पिल्लू व्हायरल होत आहे. शेजारच्या गावातील काही व्यक्ती देखील या पिल्लाला पाहण्यासाठी शिंदे यांच्या घरी येत आहेत. चमत्कारीक कोंबडीचे पिल्लू जन्माला आल्याने शिंदे कुटुंबिय देखील खूप आनंदात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com