विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदावरून वादाची शक्यता SaamTv
महाराष्ट्र

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदावरून वादाची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी यासाठी राजकीय नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता विश्व वारकरी सेनेने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच्या नेमणुकीला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. Possibility of controversy over the chairmanship of Vitthal Rukmini Temple Committee

मंदिर समितीच्या अध्यक्ष पदी काँग्रेस पक्षातील आमदाराला संधी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर), आमदार संग्राम थोपटे (भोर), आमदार कुणाला पाटील ( धुळे) या काँग्रेस आमदारांची नावे चर्चेत आहेत. मात्र विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर वारकरी संप्रदायातील व्यक्तीलाच संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी अनेक महाराज मंडळींचे प्रयत्न सुरु असतानाच काॅंग्रेसकडून पक्षातीलच एखाद्या आमदाराला समितीवर अध्यक्षपदाची संधी देण्याचे संकेत दिले आहेत. मंदिर समितीच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या आमदाराचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेत्यांनी तयारी सुरु केली आहे.

वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींचे आणि काँग्रेस नेत्यांचे फारसे संबंध नसल्याने एखाद्या वजनदार आमदाराला अध्यक्षपद देऊन संप्रदायासोबत सलोखा निर्माण करण्याची काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या बरोबरच धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांचे ही नाव सध्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

मात्र, राजकीय व्यक्ती आमदार, खासदार यांना मंदिर समिती वर अध्यक्ष नेमल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे राजकीयकरण करू नये असेही विश्व वारकरी सेनेने म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT