Manasvi Choudhary
उद्या २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरकचतुर्दशी सर्वत्र साजरी होणार आहे.
अश्विन महिन्याच्या चतुर्दशीला नरकचतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते.
नरकचतुर्दशी या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यांनतर तेलाने स्नान करून विजयाचा जल्लोष साजरा केला .
याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळी पहाटच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान केले जाते.
दिवाळीला अभ्यंगस्नानच्या दिवशी सुंगधी उटणे आणि तेल लावून खास अंघोळ केली जाते.
अभ्यंगस्नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्याची परंपरा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का कारिट हे फळ का फोडतात?
कारिट फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. दिवाळी पहाटला लवकर उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचले जाते.