Shruti Vilas Kadam
गोड आणि स्टायलिश दिसण्यासाठी फ्रंट नॉट डिझाईनचा ब्लाउज वापरू शकता. स्वीटहार्ट नेकलाइनसह हा ब्लाउज साडीला आधुनिक टच देतो. हलक्या रंगाच्या साडीसोबत हा ब्लाउज उठून दिसतो.
पफ स्लीव्ह्स पुन्हा फॅशनमध्ये परतल्या आहेत. हा डिझाईन पारंपरिक लूकला आधुनिक लूक देतो. गोल चेहरा किंवा सडपातळ शरीरयष्टी असणाऱ्यांसाठी हा डिझाईन अगदी योग्य आहे.
स्लीव्ह किंवा गळ्याभोवती आकर्षक बॉर्डर असलेला ब्लाउज साडीला रॉयल लूक देतो. गोल्डन किंवा झरी वर्क असलेले बॉर्डर या सणासाठी परफेक्ट ठरतात.
थंड हवामानासाठी फुल स्लीव्ह सिल्क ब्लाउज उत्तम पर्याय आहे. यामध्ये एम्ब्रॉयडरी किंवा सीक्विन वर्क करून तुम्ही सणासुदीचा शाही लूक आणू शकता.
स्टाइल आणि सॉफिस्टिकेशन एकत्र दाखवायचं असल्यास डीप बॅक नेक ब्लाउज वापरा. मागे डोरी किंवा लेस लावून आकर्षक डिझाईन तयार करता येते.
नेट ब्लाउज साडीला ट्रेंडी आणि फेस्टिव्ह टच देतो. यामध्ये झरी वर्क, मिरर वर्क किंवा फ्लोरल डिझाईन्स असतील तर लूक अधिक सुंदर दिसतो.
साडीच्या उलट रंगाचा ब्लाउज निवडल्यास संपूर्ण पोशाख उठून दिसतो. जसे लाल साडीला हिरवा किंवा निळा ब्लाउज, किंवा सोनरी साडीला मरून ब्लाउज हा कॉम्बिनेशन फेस्टिव्ह सिझनसाठी आदर्श आहे.