Shruti Vilas Kadam
टोमॅटोचा रस कापसाने चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटं ठेवून थंड पाण्याने धुवा. हे त्वचेतील मळ, धूळ आणि प्रदूषण काढून चेहऱ्याला ताजेतवाने ठेवते.
एक चमचा टोमॅटोचा रस आणि अर्धा चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर धुवून टाका. या पॅकमुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि उजळ दिसते.
टॅन झालेली त्वचा उजळवण्यासाठी एक चमचा बेसन आणि एक चमचा टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर व मानेला लावून २० मिनिटं ठेवा. हे टॅनिंग कमी करून त्वचेला समसमान रंग देते.
टोमॅटोचा रस गोठवून आइस क्यूब तयार करा. दररोज चेहऱ्यावर हलक्या हाताने या क्यूबने मसाज करा. यामुळे त्वचेची सूज कमी होते, रोमछिद्रे लहान होतात आणि चेहरा ताजातवाना दिसतो.
टोमॅटोचा आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण कापसाने चेहऱ्यावर लावा आणि ५ ते ७ मिनिटं ठेवा. यामुळे चेहऱ्यावर लगेच फ्रेशनेस आणि निखार येतो.
दिवाळीच्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे त्वचा कोरडी व थकलेली दिसते. त्यामुळे आठवड्यातून ३ वेळा टोमॅटो पॅक लावा. दिवाळीपर्यंत तुमची त्वचा नैसर्गिक चमकदार आणि उजळ होईल.
संवेदनशील त्वचा असल्यास टोमॅटो वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. जळजळ किंवा खाज जाणवल्यास वापर थांबवा. नैसर्गिक घटक असूनही प्रत्येकाची त्वचा वेगळी प्रतिक्रिया देते हे लक्षात ठेवा.