politics of credulity begins on the Prosperity Highway; Fadnavis criticizes MVA Government Saam Tv
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरुन श्रेयवादाचं 'सुस्साट' राजकारण; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Maharashtra Samruddhi Mahamarg: कामं पूर्ण करावी नंतर उदघाटन करावं, मात्र कधीही उदघाटन झालं तरी त्याचं स्वागत करू असंही फडणवीस म्हणाले आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: राज्यात समृद्धी महामार्गाच्या (Hindu Hruduay Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटनावरुन राज्यात श्रेयवादाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "समृद्धी महामार्गावरून कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव कोणी मिटवू शकत नाही" असं वक्तव्य केलं आहे. नागपूर ते वाशिम या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. या 220 किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते १ मे ला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे. (The politics of credulity begins on the Prosperity Highway; Fadnavis criticizes MVA Government)

हे देखील पहा -

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन जूनमध्ये होणार आहे. तसेच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) काम प्रगती पथावर आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाचे महत्व वाढले आहे, त्यामुळे या महामार्गाच्या श्रेयवादाची लढाई आता सुरु झाली आहे. फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे त्यामुळे अतिशय आनंद आहे. मात्र रस्त्याची कामं पूर्ण झाली नाहीत. कामं पूर्ण करून उद्घाटन केलं तर अधिक चांगलं होईल असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे घाईघाईने उदघाटन केलं तर रस्ता सुरू होऊ शकतो, पण त्या रस्त्याला महत्व आहे. त्यामुळे कामं पूर्ण करावी नंतर उदघाटन करावं, मात्र कधीही उदघाटन झालं तरी त्याचं स्वागत करू असंही फडणवीस म्हणाले आहेत.

याशिवाय समृद्धी महामार्गवरून त्यांनी सरकारवर टीका करत "कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गवरून कोणी मिटवू शकत नाही" असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पुढे ते म्हणाले की, हे माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, त्यामुळे हे काम करू शकलो. ही संकल्पना 20 वर्षांपासून माझ्या डोक्यात होती. मात्र या गोष्टीचा आनंद आहे की, जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उदघाटन करत आहेत असा टोमणा महाविकास आघाडीला लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, २०२९ लोकसभेआधी कर्मचार्‍यांचा पगार वाढणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Pune Accident News : १५ गाड्या चिरडल्या, ८ जणांचा होरपळून गेला जीव, १५ जण जखमी; दुर्घटनेतील मृतांची अन् जखमींची नावे आली समोर

Delhi Blast: सिरीयल स्फोटाचा कट उधळला, दहशतवाद्यांच्या टार्गेटवर 4 शहर; 32 गाड्यांमध्ये विध्वंसक बॉम्ब?

Eyelashes Care: खोट्या पापण्या वापरणं करा बंद; फक्त या घरगुती सामग्रीच्या तेलाने पुन्हा जाड आणि लांब होतील पापण्या

SCROLL FOR NEXT