Uddhav Thackeray news saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? खासदारांसोबत ठाकरेंचे आमदारही फुटणार?

maharashtra Politics : ठाकरेसेनेतील खासदारांसोबतच आता ठाकरेंचे आमदारही फुटणार असल्याची चर्चा सुरु झालीय...मात्र ठाकरेसेनेत पुन्हा बंड होणार का? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नेमकी काय रणनीती आखलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झालीय...एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता आहे...ठाकरेसेनेचे खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच आता ठाकरेंचे 16 आमदारही सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असल्याचं बोललं जातयं...त्यात ऑपरेशन टायगरची तयारी अंतिम टप्प्यात असून 7 खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाच शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमानेंनी केलाय...

दरम्यान 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे ठाकरेसेनेत मोठी अस्वस्थता पसरलीय...उद्धव ठाकरेंनी नाराज खासदारांना वैतागून "ज्यांना जायचंय त्यांनी जा..." असं विधान केल्याची माहिती समोर आली होती. यावर नेहमीप्रमाणे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धावून आलेल्या संजय राऊतांनी दावा केला की, "उद्धव ठाकरे असं काही बोललेच नाहीत." तर दुसरीकडे ठाकरेसेनेच्याच अनिल देसाईंनी मात्र वेगळा सूर लावला.

खासदार फुटू नयेत म्हणून आता ठाकरेसेनेत शपथांचा खेळ सुरू झालाय. तर या शपथांच्या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवलीय.

उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या आमदारांची 22 जूनला बैठक बोलावलीय. पहिल्या बैठकीकडे पाच खासदारांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता त्यांची निष्ठा पुन्हा तपासण्यासाठी 22 जूनला खासदारांनाही बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्याआधीच शिवसेनेचा १९ जूनला वर्धापन दिन आहे. या दिनाला कोण हजर राहणार आणि पाठ फिरवणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष असणार आहे. मात्र १९ आणि २२ जूनला उद्धव ठाकरेंची पक्ष एकसंध ठेवण्याची कसोटी आहे एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT