राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, ऑपरेशन टायगर VS ऑपरेशन लांडगा

Uddhav Thackeray Matoshree Meeting Mp Defection Rumours: ठाकरेसेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्चा राज्यात पुन्हा एकदा सुरु झालीये. मात्र, ही फूट रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक वेगळीच रणनिती आखलीये. याबाबत मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीत खलबतं झाली. ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर पुढील काळात एकजूट दिसणार का?
Uddhav Thackeray chairs a crucial meeting with Shiv Sena MPs at Matoshree amid rising Operation Tiger speculation.
Uddhav Thackeray chairs a crucial meeting with Shiv Sena MPs at Matoshree amid rising Operation Tiger speculation.saam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऱाजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार भाजपच्या वाटेवर असताना आता ठाकरेंचे खासदारही फूटणार असल्याची चर्चा सुरू झालीये. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून ठाकरेसेनाला पुन्हा एकदा खिंडार पडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे सावध झाले आहेत. ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती.

ऑपरेशन टायगर?, ठाकरे सावध

मातोश्रीवर उपस्थित खासदार

अरविंद सांवत (मुंबई)

अनिल देसाई (मुंबई)

राजाभाऊ वाझे (नाशिक)

संजय़ दिना पाटील (मुंबई)

ऑनलाईन उपस्थित खासदार

नागेश पाटील-आष्टीकर (नांदेड)

संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)

ओमराजे नाईक-निंबाळकर (धाराशीव)

संजय जाधव (परभणी)

भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

दरम्यान ऑपरेशन टायगरचा दावा ठाकरेसेनेचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी फेटाळून लावलाय. एकीकडे ठाकरे सेनेचे खासदार पक्ष सोडून जाण्याच्या चर्चा फोल ठरवत असले तरी दुसरीकडे ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा खळबळजनक दावा शिंदेसेनेनं केलाय. तर ऑपरेशन टायगर काय, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार असल्याचं सांगत ठाकरेसेनेनं पलटवार केलाय.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील बैठकीत आपल्या सर्व खासदारांना मार्गदर्शन केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिंदेसेनेनं केलेल्या दाव्यानुसार संभाव्य फुटीला रोखण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर, या बैठकीआधी सर्व खासदार उपस्थिती लावणार की काही जण दांडी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, ठाकरेंचे काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही ऑनलाईन हजर राहिले. त्यामुळे बैठकीच्या निमित्तानं का होईना दिसलेली एकजूट पुढील काळातही दिसणार का ? की राज्यात पुन्हा राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी घडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com