Shrikant Shinde And Ganesh Naik Dispute News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये येऊन लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचं गणेश नाईक यांना खुलं आव्हान

Shrikant Shinde And Ganesh Naik Dispute News : डोंबिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत समोर येऊन लढण्याचे खुले आव्हान देत जनतेचा कौलच अंतिम असल्याचे त्यांनी म्हटले.

Alisha Khedekar

  • गणेश नाईक यांच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचे सडेतोड उत्तर

  • २०२९ लोकसभा निवडणुकीत समोर येण्याचे खुले आव्हान

  • डोंबिवलीतील धार्मिक कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद

  • “जनतेचा कौल अंतिम” अशी ठाम भूमिका

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्याच्या राजकारणात सध्या गट फोडाफोडीचे सत्र सुरु असताना दुसरीकडे एकमेकांवर टीका टिपण्ण्या सुरुच आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला खासदार शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, येत्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर लढा जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे विधिवत पूजा व दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. आम्हाला माजी करण्याची भाषा त्यांनी करू नये. नागरिकांनी त्यांनाच अनेकदा माजी केले आहे, याचे भान त्यांनी ठेवावे,असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, येत्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल असे थेट खुले आव्हानही त्यांनी दिले.

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराचे आशीर्वाद घेऊन विकासकामांच्या गतीला आणखी वेग देण्याचा निर्धार व्यक्त करत, कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT