Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : काळ संघर्षाचा आहे जागं रहावं लागेल; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Political News : काल घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर पार पडले.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Political News : राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षावरून सातत्याने विरोधक आणि सत्ताधारी नेते विविध विधाने करत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काळ संघर्षाचा असून आता काहीही किंमत द्यावी लागली तरी मागे हटायचं नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

काल घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर पार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी असं म्हटलं आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावले आहे.

यासह राज्यात अन्य विरोधी नेत्यांवर देखील सीबीआय आणि ईडीची चौकशी लावलेली दिसत आहे. या सर्व प्रकरणांवरुन शरद पवारांनी (Sharad Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

"सीबीआयची चौकशी ही आता घराघरात माहिती झाली आहे. हा देश आम्ही म्हणू तसाच चालला पाहिजे, अशा भूमिकेने या देशाचे राजकारण सुरू आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काळ संघर्षाचा आहे जागं रहावं लागेल. काहीही किंमत द्यावी लागली तरीही मागे हटायचं नाही, असं शरद पवारांनी घाटकोपर येथील एक दिवसीय शिबिरात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT