Sanjay Raut News
Sanjay Raut News SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: आमचं हिंदुत्व कडवट आहे, नकली नाही...; त्र्यंबकेश्वरच्या मुद्दयावरुन संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: त्र्यंबकेश्वर मंदिरात काही दिवसांपूर्वी एका जमावाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराचा हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. खासदार संजय राऊतांनी देखील या प्रकरणी वक्तव्य केलं आहे. (Latest Political News)

महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला काही कट दिसतोय, आमचे हिंदुत्व कडवट आहे नकली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, "आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर श्रद्धास्थान आहे. माझ्या माहिती प्रमाणे तिथं कुणी घुसलं नाही. मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात आणि आरती करतात. मुस्लिम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात. हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात."

महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. बजरंग बलीची गदा मोदींनी फिरवली पण ती त्यांच्याच डोक्यात पडली. हिंदुत्व आमचा व्यवसाय नाही, राजकीय भांडवल नाही, श्रद्धा आहे. देशद्रोही कोण हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

कुरुलकर प्रकरण धागेदोरे सर्व भाजपच्या लोकांशी संबंधीत आहेत. तिथं एसआयटीची स्थापना करा आणि चौकशी करा. इथं काय एसआयटी स्थापना करताय. त्याच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि शेवगाव सारख्या दंगली घडविल्या जाताय, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा

आज त्र्यंबकेश्वरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे. साधू महंतांसह अनेक हिंदुत्ववादी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वराची महाआरती देखील आज करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात शुद्धीकरण करण्याची देखील शक्यता आहे.

सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थोड्याच वेळात साधू महंत आणि हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

SCROLL FOR NEXT