Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: संजय राऊतांच शिंदे गटाला ओपन चॅलेंज; म्हणाले, 'खरंच मर्द असाल तर...'

खरंच मर्द असाल तर समोर या आणि आमच्याशी लढा..., तेव्हा बघून घेऊ, असं तोंडसुख संजय राऊतांनी घेतलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Thane News: सोमवारी शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेना शाखेवरून दोन्ही गटात हाणामारी झाली. या सर्वांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'ज्याप्रकारे पोलीसांचा आणि सत्तेचा वापर करून काही गोष्टी ओरबाडून नेल्या जात आहेत. जे जे जाईल ते सर्व आम्ही परत मिळवू. या सर्व गोष्टी काही दिवसांसाठी आहेत.त्यानंतर ही सत्ता आणि दादागिरी देखील राहणार नाही. आमच्या लोकांना दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. म्हणजेच तुम्ही घाबरले आहात. खरंच मर्द असाल तर समोर या आणि आमच्याशी लढा..., तेव्हा बघून घेऊ, असं तोंडसुख संजय राऊतांनी घेतलं आहे. (Latest Sanjay Raut News)

“हे फक्त ठाण्यातच चाललंय. शिंदे गटाचं अस्तित्व ठाण्यात आहे. स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांचं हे काम नाही.असाल मर्द तर या समोर, पोलिसांच्या आड उभे राहून हल्ले करू नका. खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. चिंचवडमध्ये भाजपचा विजय नाही. आमचा शिवसैनिक कधीच मागे हटणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भाजप शिंदे गटाचा वापर करत आहे

भाजप शिंदे गटाचा फक्त वापर करत आहे असं सांगत राऊत पुढे म्हणाले की, 'ठाण्यात सुरू असलेला प्रकार थांबवा, सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप तुमचा वापर करत आहे, हे तुम्हाला भविष्यात कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. पोलिसांचा वापर करून जर तुम्ही शिवसैनिकांना थांबवत असाल, तर या गोष्टी मुख्यमंत्रीपदाला शोभणाऱ्या नाहीत, अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

रंगावर कोणाचीही मक्तेदारी नाही

सर्व रंगावर कोणत्याही व्यक्तीची मक्तेदारी नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवलं आहे. त्यामुळे भगवा आम्हाला प्रियच आहे, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सध्या शाखांवरून वाद होताना दिसत आहे. सोमवारी शिवाई नगर शिवसेना शाखेचं कुलूप तोडून शिंदे गटाने त्याचा ताबा घेतला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

China Video: चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

SCROLL FOR NEXT