Maharashtra Politics : एकदा नाही शंभर वेळा...; रामदास कदम यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर आगपाखड

Uddhav Thackeray Khed Sabha: खेड येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Ramdas Kadam targets Uddhav Thackeray
Ramdas Kadam targets Uddhav Thackeraysaamt tv

>> जितेश कोळी

Ramdas Kadam targets Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धवजी तुम्ही एकदा नाही शंभर वेळा खेडला आलात तरी, पुढचा आमदार हा योगेश कदमच असेल असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

खेड येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी या सभेची जोरदार तयारी केली आहे. या सभेत ठाकरे गटात ऐतिहासिक मेगा भरती होणार असल्याचा दावा देखील ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam targets Uddhav Thackeray
Political News: एकीकडे ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, अनिल परब यांची इच्छा शेवटी उद्धव ठाकरे यांनी आज पूर्ण केली.

उद्धवजी तुम्ही एकदा नाही शंभर वेळा खेडला आलात तरी, पुढचा आमदार योगेश कदमच असेल असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. तसेच योगेश कदम हे 50 हजारांची लीड घेऊन विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Ramdas Kadam targets Uddhav Thackeray
Latur News : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांच्या भावाची आत्महत्या; WhatsApp स्टेटस ठेवत संपवलं जीवन

उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे घरात बसून राहिलात आणि राष्ट्रवादीने त्याचा फायदा उचलला.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये देत आहेत. उद्धवजी तुमच्या सभेला 19 तारखेला आम्ही त्याच मैदानावर सभा घेऊन उत्तर देऊ असेही रामदास कदम म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com