Political News: एकीकडे ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

एकीकडी ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam tv
Published On

जळगाव : आमदार खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, मद्यविक्रीबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडली. पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातून (Jalgaon News) अवैध धंदे करणाऱ्यांना पकडून आणले. त्यावर पोलिसांना खडसे (Eknath Khadse) यांनी तत्काळ फोन करून, ‘तुम्ही आमच्या माणसांना पकडले आहे’, असे विचारत त्यांच्यावर दबाब टाकला. म्हणजे एकीकडे अवैध धंद्यावरून लक्षवेधी मांडायची आणि पोलिसांनी कारवाई केली, की त्यांना फोनवरून धमकी द्यायची, हा कोणता प्रकार आहे? हे कसले लोकप्रतिनिधी आहेत; असा टोला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लगावला. (Maharashtra News)

Girish Mahajan Eknath Khadse
Jalna News: मुलीच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या जवानांचा मृत्यू; विवाहाच्‍या चार दिवसांनीच अपघात

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर झालेल्या माध्‍यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. कापूस दराबाबत बोलताना महाजन यांनी सांगितले, की कापसाला खरोखरच दर कमी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर कापसाचा दर ठरतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. तरीही राज्य शासन अधिवेशन काळात कापसाच्या दराबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल.

शिवसेनेतून काढल्‍याने ठाकरेंचा तोल गेला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविषयी मंत्री महाजन म्हणाले, की शिवसेनेची (Shiv Sena) गत आता ‘काय होतास तू.. काय झालास तू?’, अशी झाली आहे. शिवसेना पक्ष गेला, चिन्ह गेले. यामुळे ठाकरे काहीही बोलताहेत. जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाचे कारण सांगून घरात बसून होते. तेव्हा महागाई दिसली नाही. आता महागाईविरोधात ओरडत फिरताहेत. त्यांना शिवसेनेने पक्षातून ढकले आहे. आता शिवसेना शिंदे गटाची आहे. चिन्हही त्यांना मिळाले आहे. ४० आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यामुळे त्यांचा तोल यापुढील काळात अजून सुटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com