Political News : ३७० कलम हटवण्याचा फायदा कोणाला झाला? काश्मिरी पंडितांच्या हत्या सत्रावरून संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On

Sanjay raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच आहे. मोदी सरकारने ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही काश्मिरात पंडितांच्या हत्येचे सत्र सुरूच असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काश्मिर पंडितांच्या हत्येवरून संजय राऊत यांनी मोदी सरकरवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून मोठी रणनीती आखली आहे. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना-भाजपच्या या यात्रेवरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

Sanjay Raut News
PM Modi News : उद्धव ठाकरे, शरद पवारांसह विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांचं PM मोदींना थेट पत्र; पत्रास कारण की....

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'प्रत्येक तालुक्यात शिवसेना नेते पोहोचले आहेत. आज खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. कोकणातील ही अतिवराट सभा आहे. सेनेबाबत कोकणाचे प्रेम आहे. अशाच सभा महाराष्ट्रात होतील. यानंतर मालेगावमध्ये सभा होईल'.

काश्मिरी पंडितांच्या हत्या सत्रावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे. आजही आक्रोश सुरू आहे. भाजपचा एकही नेता गेला नाही. ३७० कलम हटवण्याचा कोणालाही फायदा झाला नाही. पंजाबमध्ये खलिस्तानचं भुत पुन्हा उभे राहत आहेत,यावरही विचार केला पाहीजे'.

शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'तुम्ही जितक्या यात्रा काढाल, तेवढी तुमची गद्दारी आणि बेईमानीपणा दिसून येईल. मुळापासून हादरले आहेत म्हणून ते यात्रा काढत आहेत. त्यांनी कितीही यात्रा काढा, काहीही फरक पडणार नाही'.

Sanjay Raut News
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांची मुंबई हायकोर्टात धाव; काय आहे कारण?

विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राचा उद्देश सांगताना म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. कारण ते पत्र जनतेपर्यंत पोहोचावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानिक पदावर आहेत. या यंत्रणेचा गैरवापर जरी ते करत असले तरी जनतेपर्यंत ही बाब पोहोचावी म्हणून हे पत्र लिहिले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com