Nitin Gadkari  Saam TV
महाराष्ट्र

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Nitin Gadkari News : रस्त्यांवर किमान १० वर्षे तरी खड्डे पडू नये यासाठी नवीन तंत्रज्ञांचा वापर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ऑक्सिजन बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

Ruchika Jadhav

पराग ढोबळे, नागपूर

झोपडपट्टी भागात 3 हजार किलोमीटरचे रस्ते तयार करायचे आहेत, पण निधी नाही. यासाठी रस्त्यांवर किमान १० वर्षे तरी खड्डे पडू नये यासाठी नवीन तंत्रज्ञांचा वापर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने देशातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्क नागपूरच्या जामठा परिसरात साकारले आहे. या ऑक्सिजन बर्डपार्कचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर विविध मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी खड्ड्यांवर असं म्हटलं आहे.

यासाठी 20 टक्के फ्लाय एशचा वापर तसेच मध्यप्रदेशमधून 4 टक्के कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुना मिश्रित करून रस्ते बांधल्यास जमीन स्टेबलिएज होईल. स्टील उद्योगातून सलग दोन टक्के वापरली तरी जमीन स्टेबलिएज होते, असेही गडकरी म्हणालेत.

महामार्ग आणि मोठे उडान पूल बांधताना चोरी होणार नाही अशा पद्धतीच्या स्टील ऐवजी ग्लास फायबर पॉलीमरचा वापर करून रस्ते तयार केले जाणार आहेत. याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागपुरातील वाडी परिसरात उडान पूल बांधण्यात आल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

ऑक्सिजन बर्डपार्कच्या उद्घाटनानंतर याबद्दल त्यांनी म्हटलं की, प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत असून पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्येकाला होणे आवश्यक आहे. यासाठी अशा पद्धतीचे पार्क देशभरात उभे राहीले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT