Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Nitin Gadkari Life Turning Point Story: डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारा प्रसंग सांगितला आहे.
माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग
Nitin Gadkari Life Turning Point StorySaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. याच कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणाऱ्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.

आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ''माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होतं, माझी 12 वीची परीक्षा. पण मी समाजकार्यात ओढले गेलो. मी परीक्षा दिली आणि मला 52 टक्के मार्क्स मिळाले. हे दुर्भाग्य आहे. मी त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेत नापास झालो. आता मला आठ डिलीट मिळाल्या आहेत. त्यातील 6 कृषीसाठी मिळाले. पण अजून मी डॉक्टर लावत नाही. कारण अजून मला त्या लायकीचा मी वाटत नाही.''

माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग
IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

'जात, पंथ, धर्म याचा यशाशी काही संबंध नसतो'

ते म्हणाले, ''डिग्री आणि यशाचा काही संबंध नाही, असं मला माझ्याकडे पाहून एकजण म्हणाले होते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज कुठल्याही विद्यापिठात गेले नव्हते. आपण ज्यांना दुरून मोठे समजतो, ते एवढे मोठे नसतात आणि ज्यांना आपण काही समजत नसतो, ते मोठे असतात. जात, पंथ, धर्म याचा यशाशी काही संबंध नसतो. अंधारातील वर्तन हे खरं माणसाचं वर्तन असतं.''

'गोपीनाथ मुंडे यांनी मला मंत्रीपद दिलं'

नितीन गडकरी म्हणाले, ''राज्यात सत्ता आली, तेव्हा मला मंत्रीपद मिळालं. गोपीनाथ मुंडे यांनी मला मंत्रीपद दिलं. मला बांधकाम मंत्रीपद दिलं. मुंबई-पुणे महामार्ग मुंबई केला. त्यानंतर अनेक कामे केली. परत अटल बिहारी वाजपेयी यांनी बोलावलं, अनेक सडक योजना केली.'' ते म्हणाले, ''वीज, पाणी, रस्ते, संवाद असेल त्या ठिकाणी विकास होतो. त्यामुळे पुण्याचा विकास होत आहे. हे सगळ एकत्रित एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे उद्योग येतात राहणीमान वाढतं.''

माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग
IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

सावळे, लांडगे, गणवीर, बिनेकर यांना डॉ. परुळेकर पुरस्कार

दरम्यान, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार यंदा नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रिन्सिपल करस्पाँडन्ट अनिल सावळे, वरिष्ठ बातमीदार तात्या लांडगे, बातमीदार नितीन बिनेकर आणि अखिलेश गणवीर यांना देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com