Navneet Rana- Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana on Uddhav Thackeray : 'उद्धवजी तुम किस खेत की मूली...'; खासदार नवनीत राणांचा पुन्हा घणाघात

Navneet Rana on Uddhav Thackeray : जेलमधील आठवणी सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amarvati News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकीय वाटचाल पाहून दिवंगत बाळासाहेब ठाकरे देखील अश्रू ढाळत असतील, असा घणाघात नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर नवनीत राणा यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केलं. यावेळी जेलमधील आठवणी सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

गेल्या वर्षी नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठण प्रकरणी ठाकरे सरकारने जेलमध्ये टाकलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसा पठन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तब्बल 14 दिवस त्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं. (Political News)

जेलमधील आठवणी सांगताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, तुरुंगात मला वेळेत पाणी दिलं नाही. वॉशरूम वापरू देत नव्हते. १४ दिवस जेलमध्ये ठेवल्यानंतरही आणखी महिनाभर एक महिना मला आतमध्ये ठेवण्याचा कट होता. मुलं देखील मला विचारत होती, आई तु काय केलं, तुला तुरूंगात का टाकले? हे सांगताना नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेजी तुम्हाला विश्वास, घमंड, अॅटीट्यूड आहे. प्रभू श्रीरामाने अनेकांचा घमंड मातीत मिळवला आहे. तुम किस खेत की मुली हो, असं म्हणत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

ज्या कुटुंबात तुम्ही जन्माला आलात ते घर तुम्ही सांभाळून ठेऊ शकले नाही. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा तुम्ही राखू शकले नाही. आमदार तुम्ही सांभाळून ठेवू शकले नाही. बाळासाहेब ठाकरे देखील आज अश्रू ढाळत असतील, असा घणाघात नवनीत राणा यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT