Maharashtra Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Local Body Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नात्यागोत्यांचं राजकारण दिसत आहे. मंत्री-आमदारांची मुलं, पत्नी, वहिनी, पुतण्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली असून जालना, परभणी, संभाजीनगर ते बीडपर्यंत फॅमिली पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे.

Alisha Khedekar

मराठवाड्यात नात्यागोत्यांचं राजकारण शिगेला

मंत्री-आमदारांनी मुलं, पत्नी, वहिनी, पुतण्या, सासरे यांना मोठ्या प्रमाणात दिली उमेदवारी

जालना, परभणी, हिंगोली, बीड, संभाजीनगर जिल्ह्यांत नात्यागोत्यांचं राजकारण सर्वाधिक

२ डिसेंबरला निवडणूक, ३ डिसेंबरला निकाल

संपूर्ण राज्यात निवडणुकीची तयारी जोमात

माधव सावरगावे, संभाजीनगर

मराठवाड्यातील नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात अनेक नेत्यांची फॅमिली उतरली. आमदारांची मंत्र्यांची कुठे मुले , तर कुठे पत्नी, पुतण्या, वहिनीला उमेदवारी दिल्यानं मराठवाड्यात अनेक ठिकाणी फॅमिली पॉलिटिक्स दिसून आले आहे. अब्दुल सत्तार, संतोष बांगर, राजेश विटेकर, नारायण कुचे यांच्या घरात उमेदवारी मिळाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सगे- सोयऱ्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसते. कुणी पत्नीला, कुणी मुलाला, कुणी पुतण्याला, तर कुणी वहिनीला निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. काही आमदार आणि माजी आमदारांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरविले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात नगराध्यक्ष व नगरसेवक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.

धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मात्र मोठ्या नेत्यांच्या नात्यात उमेदवारी दिली गेली नसल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि गंगाखेडचे माजी आमदार मधुसुदन केंद्रे यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे यांनी गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगरात सिल्लोडमध्ये आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चिरंजीव समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरविले आहे. वैजापुरात आ. रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे, पैठणमध्ये माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष अनिल घोडके हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. गंगापूरचे माजी आ. कैलास पाटील यांचे चिरंजीव ऋषीकेश हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत.

परभणीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि हरिभाऊ लहाने यांनी आपल्या चिरंजिवांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरविले आहे. परतूरमध्ये माजी आमदार जेथलिया यांनी पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

हिंगोलीत आ. संतोष बांगर यांनी नगराध्यक्षपदासाठी वहिनींना उमेदवारी दिली आहे. आ. बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद दुर्राणी यांनी पाथरीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आ. विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे यांनी जिंतूरमध्ये, तर माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा मुलगा संदीप लहाने यांनी शिंदेसेनेकडून सेलूमध्ये नगरसेवक पदासाठी अर्ज भरले.

जालना जिल्ह्यात परतूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा विमलताई जेथलिया यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीत आ. नारायण कुचे यांचे पुतणे उज्वल कुचे, तसेच माजी आमदार दिवंगत भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्य देवयानी कुलकर्णी यांना अध्यक्षपदासाठी, केदार कुलकर्णी, सविता कुलकर्णी यांना नगरसेवक पदासाठी, तर माजी आमदार विलासराव खरात यांचे चिरंजीव विश्वजीत खरात यांना भाजपच्या वतीने नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे. अंबाजोगाईत भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुदंडा यांनी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठी देऊन भाजपात गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

After OLC: मराठी चित्रपटाला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

सर्वात मोठी बातमी! जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार, ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

IMD Recruitment: सरकारी नोकरीची संधी, हवामान विभागात भरती; पगार मिळणार १,२३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

De De Pyaar De 2 Collection : 'दे दे प्यार दे 2' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, जगभरात किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT