Manoj Jarange Patil On Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: जरांगेंच्या तब्येतीची बड्या नेत्यांना काळजी; वाचा कोण काय म्हणाले?

Maratha Aarakshan: उपोषण करत आहात ठीक आहे परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.

Ruchika Jadhav

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. पाच दिवसांपासून अन्न,पाणी त्यागल्याने त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिलाय. अशात त्यांच्या प्रकृतीसह आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात.

छत्रपती संभाजीराजे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन!

छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची कॉलवरुन विचारपूस केली आहे. आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात. आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण उपोषण करत आहात ठीक आहे परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे.

मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे -उद्धव ठाकरे

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते योग्य नाही. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. त्यामुळे ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. आरक्षणासाठी तरुण रोज आत्महत्या करत आहेत.समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केलीये.

केंद्राने यात लक्ष घालून मार्ग काढावा- जयंत पाटील

सरकारने मनोज जरांगे यांना जे आश्वासन दिले होते तो एक महिन्यांचा कालावधी होता. मागणी मान्य न झाल्याने ते पुन्हा उपोषणावर बसले आहेत. जनता देखील त्यांना उपोषण करून पाठिंबा देत आहे. राज्यपालांनी राज्यसरकारला आणि केंद्र सरकारला तातडीने संपर्क साधला पाहीजे यासाठी आम्ही त्यांना भेटलो. परिस्थिती बिघडत चालली आहे राज्य सरकार पावले उचलत नाहीए तेव्हा केंद्राने यात लक्ष घालून मार्ग काढावा, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

जरांगेंची भूमिका दुसऱ्यांच्या ताटातून घेण्याची नाही- शरद पवार

जरांगे पाटील यांची भूमिका ही दुसऱ्यांच्या ताटातून घेण्याची नाहीये. आज लोक रस्त्यावर येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी. राज्यात आणि केंद्रात ज्यांची सत्ता आहे ती सत्ता कायम राहत नाही. भाजपाच्या हातात सत्ता असली तरी परिस्तथिती काय आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय.

"आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत. जर जरांगे पाटील आत्ता म्हणत असतील की सरकारने तयारीने यावे तर एकदा नाही दहादा आमची त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी आहे. आंदोलन सुरू करण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी जरांगे पाटील यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. त्यांना त्यावेळी गोष्टी सांगितल्या होत्या. सरकारची त्यांच्याशी केव्हाही चर्चा करण्याची तयारी आहे" असं वक्तव्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

SCROLL FOR NEXT