Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : शिवसेनेला मोठा धक्का! काका - पुतणे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून संभाजी पवार व माजी आमदार मारोतराव पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Alisha Khedekar

येवल्यात शिवसेनेला मोठा धक्का

माजी आमदार मारोतराव पवारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश

छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर घेतला पक्षांतराचा निर्णय

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा आयोजित

येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार आणि माजी आमदार मारुती पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहे.

राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती सुरूच आहे. नाशिकच्या मालेगाव पाठोपाठ येवल्यात माजी आमदार मारोतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख संभाजी पवार या काका पुतण्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी मुंबई येथे प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन संभाजी पवार समर्थक हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. संभाजी पवार यांच्यासोबत माजी आमदार मारोतराव पवार, युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख बापू गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी नेते प्रवीण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे, विद्यमान संचालक कांतीलाल साळवे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

तसेच पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आठशेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दीपक जगताप, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतचे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व शेतकरी प्रतिनिधीं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

Belly Fat Reduce Tips: रोज जिम करून वजन कमी होत नाही, हे घरगुती उपाय करा, पोटाची ढेरी लगेच होईल कमी

Ajit Pawar: फोडलेले नारळ, हळद-कंकू अन् लिंबू...; बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Kitchen Cleaning Hacks : खराब झालेले लाकडी पोळपाट कसे कराल साफ ? या टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT