Mane Patil Family to Join BJP Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांच्या घरात फूट; भावानं धरली भाजपची वाट, शरद पवार गटाला धक्का

Mane Patil Family to Join BJP: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरात फुट. चुलत बंधू हिंदूराव माने पाटील भाजपच्या वाटेवर. सोलापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरात फूट.

  • माने पाटील परिवार भाजप प्रवेशाच्या तयारीत.

  • सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षानं जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. भाजपनं देखील 'ऑपरेशन लोटस' राबवत इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचे धोरण अवलंबले आहे. दरम्यान, भाजप नेते जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन लोटस'चा फटका मोहिते पाटील परिवारालाही बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काल सोलापुरातील ३ माजी आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर अकलूज येथील माने पाटील परिवाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी उपमु्ख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरात फूट पडली. मोहिते पाटील यांचे चुलत बंधू हिंदूराव माने पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडत भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोहिते पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

नुकतंच माने पाटील यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. लवकरच अकलूज येथे पक्ष प्रवेश सोहळ्याचे आजोजन करण्यात येणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात माने पाटील भाजप पक्षात प्रवेश करतील. या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात भाजपची आणखी ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

Friday Horoscope : दिवसभरात महत्त्वाची वार्ता कानावर पडणार; ५ राशींच्या लोकांचं आयुष्यात मोठं काहीतरी घडणार

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं, साध्वी ममतासाठी दाऊदही साधू

SCROLL FOR NEXT