पाथरीत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. saam tv
महाराष्ट्र

पाथरीत राजकीय राडा, काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते भिडले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह ८-१० जणांवर गुन्हा, VIDEO

Maharashtra Elections : पालिका निवडणुकांमध्ये पाथरीत राजकीय वातावरण तापलंय. शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि इतर ८-१० जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले.

Nandkumar Joshi

  • पाथरी शहरात राजकारण तापले

  • काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

  • काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर गुन्हा

  • शहरात तणाव, छावणीचे स्वरूप

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी शहरातील राजकीय वातावरण तापलं. निवडणूक प्रचारावेळी मोठा राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पोलिसांनी पाथरीत तात्काळ अतिरिक्त बंदोबस्त मागवला. तणावपूर्ण परिस्थिती असल्यानं रात्रभर शहराला छावणीचे स्वरुप आले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या असतात असं वरिष्ठ पातळीवरील नेते म्हणतात. पाथरी शहरात याचं उदाहरण बघायला मिळालं. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी शहरात परिस्थिती चिघळली. प्रचारावेळी जोरदार वाद झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रचारावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ :

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी पाथरीत तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागितला. त्यामुळं रात्रभर शहराला छावणीचे स्वरुप आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रशिंह परदेशी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्रभर ते पाथरीत तळ ठोकून होते. शिवसेनेचे मेहराज शेरगुलखान यांच्या तक्रारीवरून काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्यासह इतर आठ ते दहा जणांवर गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख- माजी आमदारामध्ये संघर्ष

पाथरी नगरपरिषदेची निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे. प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून माजी आमदार बाबाजानी आणि शिवसेनेचे सईद खान यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. २ डिसेंबरला पाथरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सईद खान आणि काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.

शहरातील एकता नगर भागात २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रचार सुरू असतानाच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच दगडफेकीची घटनाही घडली. त्यामुळं काही वेळ शहरात तणाव होता. या घटनेनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च

SCROLL FOR NEXT