Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

Independent Woman Candidate Assaulted: शिर्डीमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका अपक्ष उमेदवाराला मारहाण झालीय. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष महिला उमेदवारावर प्रचारादरम्यान हल्ला कण्यात आला. यामुळे राजकीय तणाव वाढला आहे.
Independent Woman Candidate Assaulted
Shirdi: Independent woman candidate attacked during election campaign; Shinde faction leaders accused.saamtv
Published On
Summary
  • शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला मारहाण

  • शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप.

  • घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली

सचिन बनसोड, साम प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक पातळीवरील वातावरण तापलंय. निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढलाय. घरोघरी जाऊन उमेदवार आपला प्रचार करत आहेत. मात्र त्याचवेळी प्रतिस्पर्धींकडून उमेदवारांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नंदुरबारमध्ये एका भाजपच्या नेत्याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिर्डीत एका उमेदवाराला मारहाण झालीय. नगरपरिषदेच्या एका अपक्ष उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे.

Independent Woman Candidate Assaulted
Maharashtra politics : शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा

शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला मारहाण केली. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटूंबाने मारहाण केल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराने केलाय. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Independent Woman Candidate Assaulted
उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये अपक्ष उमेदवार सरिता सोनवणे आणि पती गणेश सोनवणे प्रचार करत होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली असा आरोप अपक्ष उमेदवाराने केलाय. शिर्डी पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवाराच्या पतीने गुन्हा दाखल केलाय. शिवसेना शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उमेदवार अनिता जगताप यांचे पती विजय जगताप, मुलगा करण जगताप आणि पुतण्या प्रसाद जगाताप यांच्याकडून मारहाण झाल्याचा अपक्ष उमेदवाराच्या पतीने आरोप केलाय.

Independent Woman Candidate Assaulted
मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी

नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. नंदुरबारमध्ये उमेदवाराला फोडण्यासाठी शिवसेना शिंदेसेनेच्या आमदाराने धमकी दिली असा आरोप करण्यात आलाय.  शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांना फोडण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com