Satara Amit Bhosale Latest News Saam TV
महाराष्ट्र

Satara Crime : पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी; अमित भोसले हत्याकांडाचा १० दिवसानंतर छडा

पोलीस पत्नीनेच आपल्या व्यावसायिक पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे.

ओंकार कदम

Satara Crime News : सातारा महामार्गावरील वाढेगाव परिसरात एका व्यावसायिकाची अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला असून पोलीस पत्नीनेच आपल्या व्यावसायिक पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ५ जणांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

२४ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास सातारा (Satara) शहरालगत असलेल्या वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी एकूण ६ गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले होते.

दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी (Police) तपासासाठी विविध पथके तयार करून संशयितांचा मागोवा घेणे सुरू केले होते.ज्या ठिकाणी या व्यावसायिकाची हत्या झाली तेथे खूप अंधार असल्याने पोलिसांना कोणताही सबळ पुरावा हाती लागत नव्हता.

मात्र पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी पोलीस दलातील अत्यंत चतुर पोलिसांची हाती हे प्रकरण सोपवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोधात राज्यातील तब्बल ७ जिल्हे पालथी घातली. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केल्यानंतर इतर ५ आरोपींना पोलिसांनी गोव्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखवताच आपणच अमित भोसले यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची सुपारी (Crime News) मयत अमित भोसले याच्याच सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीनं दिली असल्याचं तपासात निष्पंन्न झालंय. पोलिसांनी अटक केलेले काही आरोपी पुण्यातील असून बाकी आरोपी हे साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

मयत अमित भोसले हा पोलिस दलात असलेल्या आपल्या पत्नीला सतत त्रास देत होता. त्यावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. माहितीनुसार, मृत अमित याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, याच कारणामुळे अमित याच्या पत्नीने त्याची सुपारी आपल्याला दिली असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT