Explosives in gadchiroli forest saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli : नक्षलवाद्यांनी जंगलात पुरली स्फोटके, पोलिसांची गस्त सुरू होती, त्यानंतर....

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत.

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांना ( Naxalite–Maoist ) आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून कठोर पावलं उचलली जातात. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अनेक पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी होतात. सामुग्री पोलीस दलाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या हेटळकसा जंगलात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या स्फोटकांचा सामुग्री पोलीस दलाने शोध लावला. नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली (Explosive seized) स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सध्या नक्षलवाद्यांचा शहिद सप्ताह सुरू आहे. याचदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. विशेष अभियान पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांची गस्त सुरु असताना त्यांना जंगलात स्फोटके सापडली. पाचशे लिटरच्या पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाकीत स्फोटके,इलेक्ट्रिक वायर व अन्य नक्षल सामग्री दोन कूकरसह जमिनीत पुरून ठेवली होती.

त्यापैकी एक स्फोटक कुकरमध्ये भरला होता. पोलीस दलाने जंगलातच नियंत्रीत स्फोट केला. क्षलवादी जंगलात घातपात घडविण्याच्या उद्देशाने स्फोटके जंगलात पुरून ठेवतात. सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी ही स्फोटके जंगलात पुरली जातात. त्यामुळे पोलीस दलाने स्फोटके जप्त केल्याने नक्षलवाद्यांचा कट उधळून लावला आहे. पोलीस दलाच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

SCROLL FOR NEXT