Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election 2022Saam Tv

Gram Panchayat Election 2022: शिंदे गटातील आमदारांचे मताधिक्य टिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; मोर्चेबांधणी सुरू

Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायती अधिक निवडून आणत आपल्या गटातील आमदारांचे मताधिक्य टिकवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे.

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला यश आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election 2022) मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या 50 आमदारांच्या मतदार संघातील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमंधील थेट सरपंच निवडणुकीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवला आहे. ग्रामपंचायती अधिक निवडून आणत आपल्या गटातील आमदारांचे मताधिक्य टिकवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

राज्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. त्यामध्ये काही ठिकाणी समिश्र निकाल लागले तर काही ठिकाणी पक्षांना निर्विवाद यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं.

या निवडणुकांनंतर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आता पुढील निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीची कुठलीही तयारी नसताना शिवसेना-भाजपच्या युतीला चांगले यश मिळाले आहे. या निमित्ताने सगळ्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Gram Panchayat Election 2022
Pune| ना शिंदे गट, ना शिवसेना... शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा डंका; ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला

दरम्यान राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुकांत्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले असल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाने दिली होती.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

नाशिक- 36, धुळे- 41, जळगाव- 20, अहमदनगर- 13, पुणे- 17, सोलापूर- 25, सातारा- 7, सांगली- 1, औरंगाबाद- 16, बीड- 13, परभणी- 2, उस्मानाबाद- 9, जालना- 27, लातूर- 6, आणि बुलडाणा- 5. एकूण- 238.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com