akola, yavatmal crime news saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime News : ९ लाखांच्या फसवणूक प्रकरणी अकोल्यातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

पाेलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळच्या (yavatmal crime news) दारव्हा (darwha police station) येथील एका व्यापाऱ्याची चणा विक्रीत आठ लाख 71 हजार 680 रुपयांनी फसवणूक करणाऱ्या अकोला येथील व्यापाऱ्यावर (case registered against trader from akola) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष कोटेचा असे संशयित आरोपीचे नाव आहे. (Maharashtra News)

व्यावसायिक सुधीर बागरेचा यांची गेल्या काही वर्षापासून काेटेचा यांच्याशी ओळख आहेत. त्याच ओळखीतून त्यांनी कोटेचा यांना 181 क्विंटल 60 किलो चणा विकला. त्याची आठ लाख 71 हजार 680 रुपये एवढी रक्कम 15 मार्चला देण्याचे ठरले होते.

परंतु पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सुधीर बागरेचा हे अकोला येथे गेले. तेथे काेटेचा यांना गाठून पैसे मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पैसे देण्यास काेटेचा यांनी टाळटाळ केली. दरम्यान सुधीर बागरेचा यांनी मनीष काेटेचा यांच्या विरुद्ध पाेलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मनीष काेटेचा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडकरांनी घेतला चित्तथरारक घोडेस्वारी प्रदर्शनाचा आनंद

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT