Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Accident News: गाडीला हरीण आडवे आल्याने सुटले नियंत्रण; भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident: रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना हा भीषण अपघात घडला आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगच्या गाडीला हरीण आडवे आल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल बदने असे अपघातात मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून या अपघातात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ही भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला पोलीस (Police) स्टेशनच्या पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर पेट्रोलिंग दरम्यान हरण आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटला.

त्यामुळे पेट्रोलिंग वाहन झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात विठ्ठल बदने हे पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. तर सिध्देश्वर विधाटे हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. भीषण अपघाताची ही घटना मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विशाल पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातातील जखमींवर शिऊरच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ छत्रपती संभाजीनगर सिग्मा हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT