Buldhana News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरक्षा देण्यासाठी बुलढाण्यात पोलिसांची रंगीत तालीम

१८ तारखेला ही यात्रा बुलढाण्यात पोहचणार असल्याने आजपासूनच तेथे पोलिसांच्या तयारीला सुरूवात

साम वृत्तसंथा

Buldhana News : राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर देगलूरमार्गे यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. आज महाराष्ट्रात यात्रेचा ९ वा दिवस आहे. तसेच यात्रेने विदर्भात प्रवेश केला आहे. अशात १८ तारखेला ही यात्रा बुलढाण्यात पोहचणार असल्याने आजपासूनच तेथे पोलिसांच्या तयारीला सुरूवात झाली आहे.

भारत जोडो पदयात्रा बुलढाण्यात येणार म्हणून सध्या पोलिसांची रंगीत तालीम सुरू आहे. १८ तारखेला भारत जोडो पदयात्रा बुलढाण्यात दाखल झाल्यावर पुढचे तीन दिवस यात्रा जिल्ह्यात असणार आहे. यात्रेतील सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पोलिस प्रशासन तैनात करण्यात आले आहे. तसेच यात्रेत जे पोलिस कर्मचारी चालत सुरक्षा देणार आहेत त्यांना पदयात्रेचा सराव व्हावा म्हणून आज रंगीत तालीम घेतली गेली. यामध्ये महिला पोलीस असंख्य कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकारीही सामील झाले होते.

पदयात्रा आज मंगळवारी सकाळी मराठवाड्यातून विदर्भातील वाशिम (vashim) जिल्ह्यात पोहचली. यात अनेक अंध मुलं देखील सहभागी झाले होते. वाढती महागाई तसेच महिलांवरील अत्याचार अशा घटनांवर आवाज उठवण्यासाठी या यात्रेत सहभागी झाल्याचे अंध मुलांनी सांगितले. तसेच आज बिरसा मुंडा यांची जयंती अससल्याने अनेक आदिवासी बांधव यात्रेत सहभागी झाले होते.

लवकरच ही पदयात्रा बुलढाण्यात दाखल होणार असल्याने तिथे जोरदार तयारी सुरू आहे. तसेच २० फूट उंच विठ्ठलाची मुर्ती उभारण्यात आली आहे. पदयात्रा जिल्ह्यात दाखल झाल्यावर असंख्य वारकरी राहूल गांधींचे अनोखे स्वागत करणार आहेत. २० फूटांच्या मुर्तीला मोठे रिंगण घालत जंगी स्वागत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसाने अक्कलकोट तालुक्याला झोडपले

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

Diabetes Paitent: मधुमेह रूग्णांनी हे ५ पदार्थ कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखर वाढते

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या 60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींची होणार चौकशी; 'या' अभिनेत्रींना पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT