Nagpur Vajramuth Sabha Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Vajramuth Sabha: नागपुरातील वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी, पण 'हे' नियम पाळावेच लागतील!

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) या सभेला अखेर नागपूर शहर पोलिसांनी (Nagpur Police) परवानगी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur News: नागपूरमध्ये (Nagpur) 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा (Nagpur Vajramuth Sabha) होणार आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) या सभेला अखेर नागपूर शहर पोलिसांनी (Nagpur Police) परवानगी दिली आहे. वेगवेगळ्या अटी घालून पोलिसांनी बुधवारी रात्री या सभेसाठी परवानगी दिली.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला परवानगी देण्यात यावी यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी या सभेला परवानगी दिली. पण या सभेसाठी नागपूर पोलिसांनी काही अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. नागपूर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महाविकास आघाडीच्या सभेला बुधवारी रात्री पोलिसांकडून परवानगी देण्यात आली. वेगवेगळ्या अटी घालून पोलिसांनी परवानगी दिली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी सभेसाठी अट घालण्यात आली आहे.

'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी १० हजार लोकांच्या क्षमतेसाठी परवानगी मागितली होती. सभेसाठी जास्त लोकं आली तर त्यांना सभा स्थळाच्या आधीच थांबविण्यात येईल. क्षमतेपेक्षा जास्त लोक येणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे गरजेचे आहे.', असं देखील नागपूर पोलिस आयुक्तांनी सांगितलं.

दरम्यान, नागपूरातील दर्शन कॉलनीमधील सद्भावनानगरमध्ये असलेल्या मैदानावर महाविकास आघाडीची ही सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे उपस्थिती लावणार आहेत.

वज्रमूठ सभेसाठी पोलिसांनी घातल्या 'या' अटी -

- सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्या.

- सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 'स्टेज स्टॅबिलीटी' प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे.

- सभेच्यावेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये. तसंच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये.

- सभा ठिकाणाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये.

- क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

- सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT