Nagpur Crime News: एकतर्फी प्रेमात मजनू झाला वेडा; कंट्रोल रूमला फोन केला, पोलीसही हादरून गेले

Latest Crime News: अवघ्या दीड तासांच्या आत नागपूर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV
Published On: 

Nagpur News: एकतर्फी प्रेमात (One Side Love) कोण काय करेल सांगता येत नाही. नागपूरमध्ये (Nagpur) प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने मुलीच्या जीवाला धोका पोहचवण्यापूर्वीच पोलिसांनी (Nagpur Police) त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तरुणाने पोलिस कंट्रोल रुमला फोन करत तरुणीच्या हत्येची धमकी दिली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी तरुणाला अटक केली.

Nagpur Crime News
Beed Crime News: मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या, बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील एका तरुणाने पोलिस कंट्रोलरुमला फोन करुन तरुणीची हत्या करण्याची धमकी दिली. तरुणाच्या या फोनमुळे नागपूर पोलिस अलर्टवर आले. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी लगेच यंत्रणा कामाला लावली. हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आणि अवघ्या दीड तासांच्या आत नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Nagpur Crime News
Beed News: नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

एकतर्फी प्रेमातून आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. संजू तिवारी असं धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी धारधार शस्त्र देखील जप्त केली आहेत. या आरोपीने मुलीला काही इजा पोहचवण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली म्हणून मोठा अनर्थ टळला. आरोपी संजू तिवारीचे आणखी काही साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Nagpur Crime News
BBC India News: बीबीसीची अडचण वाढणार, ईडीने दाखल केला गुन्हा; निधीत अनियमितता झाल्याचा आरोप

संजू तिवारी त्याच्या ओळखीमध्ये असलेल्या एका मुलीच्या एकतर्फी प्रेमात वेडा झाला होता. संजू आणि त्या मुलीमध्ये मैत्रीचे संबंध होते. परंतू संजूला मैत्रीचे नाते प्रेमात बदलायचे होते. पण मुलीला ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे संजूने तिच्या हत्येचा कट रचला. संजूने आधी पोलिस कंट्रोल रुमला फोन करत 'मी मुलीच्या घरी तिची हत्या करायला जात आहे. थांबू शकत असाल तर थांबवा', असे थेट आव्हान दिले. त्यानंतर तो तिच्या घरी गेला आणि त्याने वाद घातला. याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संजूला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.