police case filed against ncp leader vidya chavan saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा

राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनुसार चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांनी मोहित कंबोज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक वक्तव्य केलं होतं. मोहित कंबोज (Mohit Kamboj) ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला होता.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. मोहित कंबोज ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे,त्यानं मला 'जय श्रीराम'केलंय तर मी देखील त्याला 'हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली,जय सियाराम' असं म्हणत उत्तर दिलं होतं, असं विधान चव्हाण यांनी केल्यावर राजकीय वातावरण तापलं होतं.

आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आधी सितामय्याचं नाव घेतो,कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत,आमचं हिंदुत्व ढोंगी नाही,त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे,असं म्हणत विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT