Sharad Pawar Live : 'माझं बोट पकडून आलेले मोदी इतके महागात पडतील वाटलं नव्हतं'

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Sharad Pawar Narendra Modi latest News
Sharad Pawar Narendra Modi latest NewsSaam TV
Published On

Sharad Pawar Todays Speech : माझं बोट पकडून राजकारणात आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं' असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लगावला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषदही घेतली. यावेळी बोलताना पवारांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. (Sharad Pawar vs Narendra Modi)

Sharad Pawar Narendra Modi latest News
Sharad Pawar : अच्छे दिन लोकांना पाहायलाच मिळाले नाही; शरद पवारांचा भाजपला टोला

काय म्हणाले शरद पवार?

'भाजपने 2014 मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अच्छे दिन येणार असं म्हणत भाजपने आश्वासनं दिली होती. अच्छे दिन लोकांना पाहायला मिळालेच नाही, उलट भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतंय', माझं बोट पकडून आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं' अशी टीका पवारांनी मोदी सरकारवर केलीय.

इतकंच नाही तर पवारांनी या पत्रकार परिषदेत मोदी सरकारने सर्वसामांन्य जनतेला दिलेल्या आश्वासनाची यादीही वाचून दाखवली. 2022 पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचं पक्कं घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल, अशी आश्वासने भाजपने जनतेला दिली होती. मात्र भाजपने सांगितलेली एकही आश्वासने अजून पूर्ण केली नाही. असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील 30 टक्के घरात अजूनही शौच्छालये नाहीत. असंही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar Todays News)

Sharad Pawar Narendra Modi latest News
Maharastra Politics Crises : शिंदे गटातील १६ आमदार मातोश्रीच्या संपर्कात?; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

भाजपकडून ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांवर दबाव आणल्यासाठी केला जात असल्याचा आरोपही शरद पवारांनी केला. कर्नाटकात भाजपचं सरकार नव्हतं. तेथील नेत्यांवर दबाव आणून भाजपने सरकार पाडलं, देशातील अनेक राज्यात अशीच परिस्थिती आहे. असंही शरद पवार म्हणाले.

पवारांनी बिल्किस बानो प्रकरणावरूनही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना कोर्टाने शिक्षा सुनावली. मात्र गुजरात सरकारने त्यांना सोंडून दिलं. देशात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढत आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी मोदी सरकारकडून कुठलेही प्रयत्न केले जात नाहीये. अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com