police bharti revised schedule dharashiv amravati and dhule  Saam Digital
महाराष्ट्र

Police Bharti: धुळे, अमरावतीसह धाराशिवमधील पाेलिस भरती प्रक्रियाच्या पुढील तारखा जाहीर, जाणून घ्या

police bharti revised schedule dharashiv amravati and dhule : अतिशय पारदर्शक पद्धतीने पाेलिस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. अफवांना व गैरप्रकारांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

Siddharth Latkar

बालाजी सुरवसे / भूषण अहिरे / अमर घटारे

ज्या ज्या भागात पाऊस असेल त्या त्या भागातील पाेलिस भरतीमधील मैदानीची प्रक्रिया स्थगित करुन नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या हाेत्या. त्यानूसार आज (साेमवार) धाराशिव येथे उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार हाेती. परंतु पावसामुळे ती उद्या (ता. 2 जूलै) घेण्यात येणार आहे. दरम्यान धुळे आणि अमरावती जिल्ह्यात पाेलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा 7 जूलैला हाेणार असल्याची माहिती पाेलिस प्रशासनाने दिली.

धाराशिव पोलिस दलात 19 जुन पासुन पोलिस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. रविवारी (ता.30 जून) झालेल्या पावसामुळे आज (साेमवार, ता. 1 जूलै) होणारी पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. आज बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी उद्या (ता. 2 जुलै) घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. याची नाेंद उमेदवारांनी घ्यावी असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.

धुळ्यात 7 जूलैला लेखी परीक्षा

धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे सुरु असलेली पोलिस भरती परीक्षेत मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षा पूर्ण झाल्या नंतर आता 7 जुलैला लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेत 57 शिपाई पदाच्या भरतीसाठी 667 उमेदवार मैदानी परीक्षा पास झाले आहेत.

जिल्हा पोलिस कवायत मैदानावर सुरु असलेल्या पोलिस भरती मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षेसाठी एकूण 2 हजार 447 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी 1 हजार 269 उमेदवार हे मैदानी परीक्षेला पात्र ठरले होते. त्या सर्वांची मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षा पार पडली आहे. आता या मैदानी चाचणीमध्ये पास झालेल्या सर्व उमेदवारांची 7 जुलैला लेखी परीक्षा पार पाडणार आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात परीक्षा

अमरावती शहर पोलिसांच्या 74 पदांसाठी पोलिस विभागाने 2865 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती. त्यापैकी 1431 उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. यातील 929 उमेदवारांची लेखी परीक्षा अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात 7 जुलैला हाेईल अशी माहिती अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV Awareness : मच्छर चावल्यास HIVचा संसर्ग पसरु शकतो का?

'काँग्रेस आमदारानं मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी..' ट्रान्सजेंडरकडून गंभीर आरोप

GK: 'हा' अनोखा पक्षी कोणता? १० महिने सतत आकाशात उडतो आणि झोपतो, जाणून घ्या

Marathi Movie: 'मराठी शाळा पुन्हा भरणार…'; मराठी शाळाचं महत्व सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गणपती बाप्पा मोरया म्हणताना 'मोरया' या शब्दाचा नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT