Nashik Crime News : सिन्नरच्या गुळवंच येथे पाच लाखांच्या खंडणीसाठी किराणा दुकानात गावठी बॉम्ब ठेवल्याप्रकरणी पाेलिसांनी दाेन संशयितांना अटक केली आहे. बॉम्बशोधक पथकाने तब्बल आठ तासानंतर गावठी बॉम्ब निकामी केले. (Maharashtra News)
मद्यधुंद अवस्थेत किराणा दुकानदाराकडे पाच लाखांची खंडणी मागत पैसे न दिल्यास बॉम्बने दुकान उडवून देण्याची धमकी देत स्टीलच्या डब्यातील गावठी बॉम्ब दुकानात ठेवल्याची घटना (nashik) सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे घडली.
संबंधित दुकानदाराने मुसळगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर आठ तासांनी मालेगाव येथील बॉम्बशोधक पथकाने हा गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या गावठी बॉम्बचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशा प्रतिक्रिया गुळवंच गावातून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
पाणी जारचा व्यवसाय करणाऱ्या विष्णू एकनाथ भाबड आणि त्याचा साथीदार बबन मल्हारी भाबड यांनी मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्टीलच्या चौकोनी डब्यात विष्णू भाबड याने गावठी बॉम्ब बनवला होता. सहा इंची आणि तीन इंची अशा दोन पाइपमध्ये बॉम्ब बनविण्यात आला होता. त्यात सुतळी बॉम्ब, डिटोनेटर, वायर, पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला होता. त्यास वायर जोडली होती.
मालेगाव येथील बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करतायत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.